गोव्यात पोटनिवडणुकीत पर्रिकरांची जागा राखण्यात भाजपला अपयश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। पणजी

लोकसभा निवडणुकीत बहुमताकडे वाटचाल करणाऱ्या एनडीएमधील भाजपला गोव्याच्या पोटनिवडणुकीत पर्रिकरांची जागा राखण्यात मात्र अपयश आले आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजी विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. वीस वर्षांहून अधिक काळ  पर्रिकरांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जेव्हा राज्यात जरी भाजपला सत्ता राखण्यात अपयश मिळाले होते, तरी पर्रिकरांना मात्र हा मतदारसंघ राखण्यात यश मिळाले होते. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली होती.

राज्यात एकूण 40 विधानसभा सदस्य असून 2017 मध्ये भाजपचे 12 उमेदवार निवडून आले होते.  त्यांना मगोपचा (mgp) पाठिंबा आहे. गोवा विधासभेत काँग्रेसचे संख्याबळ 15 आहे. गोवा फ़ॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई, तीन अपक्ष , जीएफपी आणि एमजीपीचे प्रत्येकी तीन आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांनी सत्ता स्थापन केली होती.