भाजपच्या विजयानंतर ममतांचा मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे. शनिवारी कोलकातामध्ये पत्रकार परिषद घेत ममतांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला.

यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मतांच्या विकेंद्रीकरण झाले यावर माझा विश्वास नाही. पक्षांची चेअरपर्सन म्हणून काम करण्यास तयार असल्याने मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ इच्छित आहे. यावेळी ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरही आरोप करत ते भाजपच्या दावणीला बांधले गेले आहे असा गंभीर आरोप केला.