टिप्परच्या धडकेत सहा महिन्यांची गर्भवती पत्नीसह पती ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, जालना

भरधाव टिप्पर दुचाकीला धडकून यात पती-पत्नी ठार झाल्याची घटना जालन्यात घडली असून भोकरदन तालुक्यातील जानेफळ येथील योगेश बोडखे हे आपल्या सहा महिन्याच्या गरोदर पत्नीची जालन्यातून वैद्यकीय तपासणी करून गावाकडे परत जात असतांना हा अपघात घडला.

घाणेवाडीकडून जालन्याकडे गाळ घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने योगेश यांच्या दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की योगेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर झालेल्या पत्नी पूजा बोडखे यांना जालन्यात प्राथमिक उपचार करून संभाजीनगरला दाखल करत असताना वाटेतच मृत्यू झाला.

योगेश बोडखे हे घाणेवाडी जवळ आपल्या सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीची जालन्यातून वैद्यकीय तपासणी करून गावाकडे परत असताना ही घटना घडली आहे. दरम्यान, टिप्पर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.