
सामना ऑनलाईन । लंडन
लंडनमधील 12व्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या औपचारिक उदघाटन सोहळ्यात आपले हिंदुस्थानद्वेष्टे रूप नोबेलप्राप्त मलाला युसूफझाई हिने दाखवले. लुटुपुटुच्या 60 सेकण्ड चॅलेंज गेममधे हिंदुस्थान १९ धावा करीत शेवटी राहिला. तर पाकिस्तान ३८ धावा नोंदवत सातवा आला. आपल्या भाषणात हाच मुद्दा उचलत मलाला हिने, पाकिस्तान हमने ठीक-ठाक किया, यह खराब नही, कमसे कम हिंदुस्थान की तरह आखिर तो नही आये, अशा शब्दांत हिंदुस्थानाला कमी लेखले. तिच्या या वक्तव्यावर हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांनी जोरदार संताप व्यक्त करीत मलालाला ट्रोल करीत, कशाला पाकिस्तानचा मोठेपणा सांगतेस ,तिथे तू सुरक्षित राहू शकतेस का? असा संतप्त सवाल ट्विटर आणि अन्य सोशल साइट्सवरून केला.
You praise Pakistan, a nation where you can’t go.
You demean India like a typical brainwashed Pakistani, yet India is a nation which you can safely visit.
Stop being petty and disgusting @Malala. pic.twitter.com/MGugFTKCfV— VJ (@vinayak_jain) May 30, 2019
इंग्लंड आणि वेल्समधील 12व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे औपचारिक उदघाटन बुधवारी रात्री लंडन मॉलमधे झाले .यावेळी सर्व सहभागी संघांत 60 सेकण्ड चॅलेंज गेम ही गमतीची स्पर्धा खेळवण्यात आली.त्यात पाकिस्तानच्या वतीने माजी क्रिकेटर अजहर अली आणि मलाला युसूफझाई यांनी तर हिंदुस्थानच्या वतीने माजी कर्णधार अनिल कुंबळे आणि अभिनेता फरहान अख्तर यांनी भाग घेतला होता.त्यात यजमान इंग्लंडने सर्वाधिक 74 धावा नोंदवत जेतेपद पटकावले. तर पाकिस्तान 38 धावा करीत सातव्या स्थानावर राहिला. मग बोलताना सर्वात शेवटी राहिलेल्या हिंदुस्थानवर मलालाने टीकेची भडास काढली.
Look who’s talking about her country, where you can’t go. At least you can come India safely. So if you want to cheer then cheer for the countries which are far far better then yours. After wearing Pakistan’s T-shirt, asliyat nikal hi gayi
— Payel (@PayelbhowmickS) May 30, 2019
हिंदुस्थानी ट्रोलर्सचा मलालावर हल्लाबोल
मलालाच्या हिंदुस्थानला कमीपणा देण्याच्या वक्तव्यावर हिंदुस्थानी क्रिकेटशौकिनांनी जोरदार हल्लाबोल चढवला.आता तू खरी पाकिस्तानी वाटतेस.कारण तुझे समर्थन करणाऱ्या हिंदुस्थानविरोधातही तू हिरवी गरळ ओकतेस, हे ठीक नाही असे अनेक यूजर्सनी तिला सुनावले. एक यूजर म्हणाला, तू ज्या पाकिस्तानचे एवढे गोडवे गातेस, तिथे तू राहायला जाऊही शकत नाहीस. एखाद्या कडव्या हिंदुस्थानद्वेष्ट्या पाकिस्तानी नागरिकासारखी तू लंडनमध्ये बोललीस. असो तू हिंदुस्थानात आलीस तर आमच्या देशात सुरक्षित कुठेही फिरू शकशील याची हमी आम्ही देतो, असेही या युजरने मलालाला सुनावले.
.@malala you can freely come to #India on visa ;
No restriction on girls clothes, speech, music, films, food, sports & solo traveling ;
You will get World class hospital, education institutions & infrastructure etc ;
BUT
You can’t even go to #Pakistan #Malala #StopHypocrisy— Chandra (@chandra_sayz) May 30, 2019
























































