
सामना ऑनलाइन । इतानगर
भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये एक विचित्र घटना घडली आहे . तापीर गावातील भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या घरासमोर एका अज्ञात व्यक्तीने उभी असलेली गाडी जाळली आणि नंतर भटक्या कुत्र्याचा गळा चिरुन त्याला ठार मारण्यात आले. ही घटना शुक्रवारी पहाटे सहा वाजता घडली ; तेंव्हा तो रस्ता निर्मनुष्य होता. त्यामुळे आरोपीला शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
राज्यातील भाजपा नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे. कायदा सर्वांना समान आहे त्यामुळे कोणीही कायद्याचे उल्लंघन करु नये, अशा घटना भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखू शकत नाहीत, असे पक्षाचे माध्यम सचिव नालोंग मिजे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु या घटनेची जबाबदारी अद्याप कोणीही घेतीली नाही आहे.
























































