न्यूझीलंडचा धडाकेबाज विजय, श्रीलंकेवर 10 विकेट राखून मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कार्डिफ

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या महाकुंभातील सलग तिसरा सामना एकतर्फी झाला. शनिवारी न्यूझीलंडने श्रीलंकेवर 10 गडी राखून मात करत स्पर्धेतील रुबाबदार विजय नोंदवला. श्रीलंकेला 29.2 षटकांत 136 धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने 16.1 षटकांत बिनबाद 137 धावा करून सहज विजय मिळवला. आघाडीची फळी कापून काढणारा मॅट हेन्री सामन्याचा मानकरी ठरला. उद्घाटनाच्या लढतीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा, तर दुसऱया लढतीत वेस्ट इंडीजनेही पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

हेन्रीने कापली आघाडीची फळी

त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकणाऱया न्यूझीलंडने श्रीलंकेला फलंदाजी दिली. मॅट हेन्रीने आघाडीची फळी कापून काढताना लाहिरू थिरीमाने, कुसल परेरा व कुसल मेंडिस यांना धावफलकावर अर्धशतक लागण्यापूर्वीच बाद केले. त्याने दुसऱयाच चेंडूवर लाहिरू थिरीमानेला (4) पायचित करून न्यूझीलंडला सनसनाटी सुरुवात करून दिली. थिरीमानेच्या जागेवर आलेल्या कुशल परेराने दुसरा आघाडीवीर दिमुथ करुणारत्नेच्या साथीने दुसऱया गडय़ासाठी 42 धावांची भागीदारी करून श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र 24 चेंडूंत 4 चौकारांसह 29 धावा केल्यानंतर मॅट हेन्रीला टोलावण्याच्या नादात परेराने कॉलिन डी ग्रॅण्डहोमकडे झेल दिला अन् श्रीलंकेला दुसरा धक्का बसला. कुशल परेराच्या जागेवर आलेला कुशल मेंडीसही हेन्रीच्या पुढच्याच चेंडूवर गप्टीलकरवी झेलबाद झाल्याने श्रीलंकेची 8.2 षटकांत 3 बाद 46 अशी दुर्दशा झाली.

धावफलक

श्रीलंका -लाहिरू थिरिमाने पायचित गो. हेन्री 4, दिमुथ करुणारत्ने नाबाद 52, कुसल परेरा झे. डी ग्रॅण्डहोम गो. हेन्री 29, कुशल मेंडीस झे. गप्टील गो. हेन्री 0, धनंजया डि’सिल्व्हा पायचित गो. फर्ग्युसन 4, अँजेलो मॅथ्यूज झे. लॅथम गो. डी ग्रॅण्डहोम 0, जीवन मेंडीस झे. निशाम गो. फर्ग्युसन 1, थिसारा परेरा झे. बोल्ट गो. सँटनर 27, इसुरू उदाना झे. हेन्री गो. निशाम 0, सुरंगा लकमा झे. सॅण्टनर गो. बोल्ट 7, लसिथ मलिंगा त्रि. गो. फर्ग्युसन 1. अवांतर- 11, एकूण – 29.2 षटकांत 136 धावा. बाद क्रम – 1-4, 2-46, 3-46, 4-53, 5-59, 6-60, 7-112, 8-114, 9-130, 10-136. गोलंदाजी -मॅट हेन्री 7-0-29-3, ट्रेंट बोल्ट 9-0-44-1, लोकी फर्ग्युसन 6.2-0-22-3, कॉलिन डी ग्रॅण्डहोम 2-0-14-1, जेम्स निशाम 3-0-21-1, मिचेल सँटनर 2-0-5-1.

न्यूझीलंड – मार्टिन गप्टील नाबाद 40, कॉलिन मुन्रो नाबाद 46. अवांतर – 3, एकूण – 16.1 षटकांत बिनबाद 137 धावा. गोलंदाजी – लसिथ मलिंगा 5-0-46-0, सुरंगा लकमा 4-0-28-0, इसुरू उदाना 3-0-24-0, थिसारा परेरा 3-0-25-0, जीवन मेंडीस 1-1-0-11-0.

गप्टील-मुन्रो यांची नाबाद अर्धशतके
श्रीलंकेकडून मिळालेल्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने सफाईदार फलंदाजी केली. ही जोडी फोडण्यासाठी श्रीलंकेने पाच गोलंदाज वापरले, पण काहीच उपयोग झाला नाही. मार्टिन गप्टीलने 51 चेंडूंत 8 सणसणीत चौकार व 2 उत्तुंग षटकार ठोकून आपली नाबाद 73 धावांची खेळी सजवली. कॉलिन मुन्रोने 47 चेंडूंत नाबाद 58 धावा करताना एका षटकारासह 6 चेंडू सीमापार