… तर लोकसभेच्या दारात आंदोलन, सुजय विखे-पाटील यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

कोकणातून जे पाणी वाया जाते. ते पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्यास नगर जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा संपुष्टात येणार असून या मागणीसाठी वेळ पडल्यास आपण लोकसभेच्या दारात आंदोलन करुत मात्र नगर जिल्ह्यातील दुष्काळ हटवूच अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

खासदार झाल्या नंतर मंगळवारी प्रथमच डॉ. विखे यांनी तालुका दौरा करत जोगेवाडी, मोहटा,चिंचपूर इजदे या ठिकाणच्या जनावरांच्या छावण्यांना भेट देत छावणी चालक व पशुधन मालकांशी चर्चा केली. या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे,पं.स. उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी सभापती काका शिंदे, नगरसेविका मंगल कोकाटे हे उपस्थित होते.