
सामना ऑनलाईन । लंडन
विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये कात टाकलीय. क्रिकेटच्या रणांगणात बाजी मारणाऱ्या टीम इंडियाच्या यशाचे रहस्य कोणते, असा प्रश्न प्रतिस्पर्ध्यांसह क्रिकेटप्रेमी व क्रिकेटतज्ञांना पडलाय. यावेळी एका इंग्रजी दैनिकाच्या साइटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार टीम इंडियाच्या ‘बॉण्डिंग’ सेशनमुळे कायापालट झाला आहे असे समजते. या सेशनमध्ये खेळ, जेवण आदी बाबी खेळाडू एकसाथ करताहेत.

























































