मेहकर : रस्त्याच्या कामासाठी अर्थ संकल्पात 18 कोटी 27 लाखांची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मेहकर

मेहकर मतदार संघातील ग्रामीण व इतर रस्त्याच्या कामासाठी शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी अर्थ संकल्पात १18 कोटी 27 लाखांची तरतूद करून घेतली आहे. मेहकर विधानसभा मतदार संघातील रस्त्याच्यी सुधारणा होऊन दळणवळण सुलभ होण्यासाठी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आमदार संजय रायमुलकर यांनी पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला.

नुकतेच ग्रामीण भागातील काही रस्ते दर्जोन्नत करून घेऊन विशेष दुरुस्ती अंतर्गत 17 कोटी रुपये निधी प्राप्त केला. तर आता 18 कोटी 27 लाख रुपयांची तरतूद करून घेतली. या निधीत शेंदुरजन, राजेगाव, सुलतानपूर, गुंधा, हिरडव, वढव रस्त्याची सुधारणा (3 कोटी 30 लाख) आलेगाव, राजगड, डोणगाव, रस्त्याच्या लांबीची सुधारणा (1 कोटी 20 लाख) अमडापूर, जानेफळ, पांगरखेड, बेलगाव, केनवड रस्त्याच्या लांबीची सुधारणा (67 लाख 20 हजार) चिखली, लव्हाळा, मेहकर, सोनाटी या मार्गावरील लांबीची सुधारणा (2 कोटी 64 लाख) अमडापूर, जानेफळ, लोणीगवळी, शेलगाव देशमुख, पांगरखेड, बेलगाव, केनवड रस्त्याच्या लांबीची सुधारणा (40 लाख रुपये) जिल्हा सिमेपासून साखरखेर्डा, वडगाव माळी, सुलतानपूर मार्ग मजबूतीकरण करणे (1 कोटी 80 लाख), याच मार्गावरील लांबीचे नुतनीकरण सुधारणा करणे (1 कोटी) शेंदुरजन, सायाळा, कळपविहीर, बरटाळा, मेहकर रस्ता सुधारणा करणे (1 कोटी) मेहकर तालुका, अंत्री देशमुख, गुंधा रस्ता लांबीची सुधारणा (1 कोटी 26 लाख) व वडगाव माळी, सावंगी विहीर, कोयाळी, बाभूळखेड, मेहकर, सारंगपूर रस्ता लांबीची सुधारणा करणे (6 कोटी) ही सर्व विकास कामे लवकरच सुरु होणार असल्याचे आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितले.