
सामना ऑनलाईन । रांची
‘योगासनाला देश, धर्म, जाती, भाषा, वय, गरिब-श्रीमंत या सर्वांचे बंधन नाही. योग हा सर्वांसाठी आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योग दिनानिमित्त केलं. नरेंद्र मोदी हे आज योग दिनानिमित्त हे रांची येथे उपस्थित होते.
Sharing some more pictures from Ranchi, where Yoga Day was marked with great vigour. #YogaDay2019 pic.twitter.com/sf7UIjmQy0
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2019
आज रांची येथील प्रभात तारा मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित योगा दिवस साजरा झाला. यावेळी तब्बल 40 हजार लोकं उपस्थित होती. या कार्यक्रमाची थीम ‘योगा फॉर हार्ट’ ठेवण्यात आली होती. यावेळी मोदींनी तब्बल 45 मिनिटे वेगवेगळ्या प्रकारची 13 योगासने केली.
‘हल्ली ड्रॉईंग रूमपासून बोर्ड रुमपर्यंत शहरातील पार्क पासून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सपर्यंत योग पोहोचला आहे. आजारांपासून आपली लाईफस्टाईल सुधारण्यापर्यंत सर्वांसाठी योगा उपयोगी आहे. त्यामुळे त्यावर फोकस असले पाहिजे. आता मला आधुनिक योगा हा शहरातून गावांकडे न्यायचा आहे योगाला गरिब व आदिवासींच्या जीवनातील अविभाज्य भाग बनवायचा आहे. जेणेकरून कोणत्याही आजाराचा त्यांना त्रास होणार नाही, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

























































