लेख : माओवाद्यांकडून होणारे स्त्री अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

माओवादग्रस्त भागांतील महिलांची सुरक्षितता आणि माओवाद्यांकडून होणारे स्त्री अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेकदा केल्या; पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. आगामी काळात ग्राम सुरक्षा समित्यांची निर्मिती करण्यावर शासनाने भर द्यावा. अशा समित्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निर्माण कराव्यात. माओवादी हिंसाचारापासून सामान्यांचे रक्षण गाव सुरक्षा दलेच करू शकतात. प्रत्येक गावात कश्मीरप्रमाणे गाव सुरक्षा दले (Village Defence Council) तयार करावी लागतील. त्यांना होमगार्ड, निवृत्त सैनिक आणि पोलिसांची मदत मिळू शकते.

दंडकारण्यात अनेक वर्षे दहशत माजवणारी जहाल नक्षलवादी नर्मदाक्का अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली. तिच्यावर खून आणि हत्याकांडासारखे इतके गंभीर गुन्हे आहेत की, आता तिला जामीनही मिळणे अशक्य आहे. त्यातच नर्मदाक्काची तब्येत बरी नसते. त्यामुळे तुरुंगातही ती किती काळ तग धरेल हे सांगता येत नाही. तिच्या अटकेने माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. ती माओवाद्यांच्या महिला आघाडीची प्रमुख होती. छुपे व छापामार पद्धतीचे हल्ले करण्यात नर्मदाक्का तरबेज होती. लोकसभेच्या प्रचारात दंतेवाडा येथे भाजप आमदार व इतर पाचजणांचा माओवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा कटही नर्मदाक्कानेच आखला होता. नर्मदाक्काचा नवरा किरणकुमार हाही कट्टर माओवादी आहे. तोही 15 जूनला पोलीस कारवाईत सापडला. त्याचे उच्च शिक्षण आयआयटीमध्ये झाले आहे. तो जितका बुद्धिमान तितकाच क्रूरही आहे.

नर्मदाक्का जरी दंडकारण्यातील महिला माओवाद्यांची प्रमुख होती तरी ती माओवादी संघटनांमध्ये होणारे आणि माओवाद्यांकडून माओग्रस्त भागामध्ये होणारे स्त्र्ायांवरील अत्याचार थांबवू शकली नाही. माओवादी संघटनेत जिथे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत, पण त्यांचं तिथलं जीवन सर्वसामान्य स्त्रीपेक्षाही भयंकर विदारक आहे. आदिवासी स्त्र्ाया पूर्वीसारख्या सुरक्षित नाहीत. शतकानुशतकं शांतपणे जीवन जगणाऱया आदिवासी प्रदेशात माओवाद्यांनी जेव्हापासून शिरकाव केला, त्या वेळेपासून तिथलं सर्वसामान्य समाजजीवन उद्ध्वस्त झालं आहे.

माओवादी संघटनांमध्ये स्त्रीचं काय स्थान आहे? सर्वच प्रकारच्या अन्याय, अत्याचारांच्या विरोधात आणि शोषणाच्या विरोधात सतत ओरड करणाऱया माओवादी संघटनांमधील स्त्रियांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली तर माओवाद्यांची उक्ती आणि कृती यातील तफावत लक्षात येते.

माओवादी संघटनेत अनेक वर्षे राहून नंतर शरण आलेल्या काही महिला माओवाद्यांची हकीकत त्यांच्याच तोंडून ऐकल्यानंतर अंगावर काटा येतो. शरण आलेल्या महिला माओवाद्यांना शोधून काढणं आणि त्यांना बोलतं करणं हे काम कठीण आहे. शरणागती पत्करलेल्या महिला पोलिसांच्या खबरी म्हणून काम करत असल्याचा माओवाद्यांना संशय असतो. याच संशयापोटी त्यांची हत्या करण्यात येते.

माओवादी चळवळीच्या व्यूहरचनेप्रमाणे मुलींची संघटनेत खालच्या पातळीवर मोठय़ा प्रमाणात भरती केली जाते. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये माओवादी संघटनेच्या मुलींना मुद्दाम आघाडीवर ठेवलं जातं. चकमकीत स्त्रियांचा मृत्यू झाला तर माओवादी संघटनेतील पुरुष पोलीस आदिवासी स्त्र्ायांना मारत आहेत अशी बोंब उठवतात. त्यामुळे असंख्य आदिवासी मुली, स्त्रिया अकारण भरडल्या जातात.

गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक गावातून घरटी एक मुलगा किंवा मुलगी चळवळीत सामावून घेण्याची सक्ती माओवाद्यांकडून केली जाते. मुलींना ‘‘उचलून नेऊ’’ अशी धमकी देणारे माओवादी नव्या पिढीला कारवायांचे बाळकडू वयाच्या आठव्या वर्षापासून देत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

पोलिसांची छावणी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी पोलिसांना भाजीपाला, दूध, पाणी इत्यादी दैनंदिन वस्तू पुरवणाऱयांना अद्दल घडविण्यासाठी त्यांच्या घरातील तरुण मुली, बायकांना माओवादी पळवून नेतात. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांतील छोटे व्यापारी, किराणा दुकानदार यांच्याकडील स्त्रिया माओवाद्यांनी पळवून नेलेल्या आहेत, आजही हे सत्र सुरू असावे. काहींना लैंगिक शोषणानंतर गर्भधारणा झाल्यास किंवा कंटाळा आल्यास वर्ष, सहा महिन्यांनी सोडून दिले जाते. तर काही कायमच्या अदृश्य होतात. माओवाद्यांच्या धाकाने कुणीही पोलिसांत जाण्याची हिंमत करत नाही. या भागातील मानवी हक्कांच्या आणि स्त्राrयांच्या हक्कांच्या संदर्भात कार्य करणाऱया संघटनांना, माओवाद्यांचे वकीलपत्र घेणाऱयांना, स्थानिक वृत्तपत्रांना वर उल्लेखिलेल्या बाबी ठाऊक नाहीत असे म्हणणे धारिष्टय़ाचे होईल. मात्र याविरुद्ध कुणीही आवाज उठवत नाही. कारण हे सर्व माओवाद्यांच्या प्रभावाखाली आणि माओवाद्यांच्या बाजूने काम करीत आहेत. स्थानिक जनता व पोलिसांना या सर्व बाबींची खडान्खडा माहिती आहे, पण जनता माओवाद्यांच्या धाकाने तर पोलीस राज्यकर्त्यांची काही करण्याची इच्छा नसल्यामुळे काही करू शकत नाहीत. माओवाद्यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये 30 टक्के महिला आहेत. महिलांना जेवण बनवणे, घरकाम यात गुंतवले जाते. वरिष्ठ माओवादी स्वतःच्या सुरक्षेसाठी महिलांना बॉडीगार्ड म्हणून नियुक्त करतात. म्हणजे त्यांचा गैरवापर करणे सोपे होते. हजारो महिला माओ संघटनांत सामील आहेत. जोपर्यंत माओ चळवळीचा पुरता बीमोड होणार नाही तोपर्यंत या संघटनेतील महिलांचे सुटणार नाहीत.

अनेक लहान मुलांना पण माओ चळवळीमध्ये सामील केले आहे. मुलांच्या तुकडय़ा माओवाद्यांना उपयुक्त ठरतात. कारण त्यांच्या लहान वयामुळे त्यांच्यावर संशय घेतला जात नाही. या मुलांमार्फत सुरक्षा दलाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते, शस्त्र आणि पैशांचा पुरवठा करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. अनेकदा भूसुरुंग पेटविण्यासाठी देखील या मुलांचा वापर केला जातो.

माओवादग्रस्त भागांतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या घोषणा केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेकदा केल्या; पण त्या पूर्ण करण्याबाबत फारसे काहीच झाले नाही. आगामी काळामध्ये ग्राम सुरक्षा समित्यांची निर्मिती करण्यावर शासनाने भर द्यावा. अशा समित्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निर्माण कराव्यात. माओवादी हिंसाचारापासून सामान्यांचे रक्षण गाव सुरक्षा दलेच करू शकतात. प्रत्येक गावात कश्मीरप्रमाणे गाव सुरक्षा दले (Village Defence Council) तयार करावी लागतील. त्यांना होमगार्ड, निवृत्त सैनिक आणि पोलिसांची मदत मिळू शकते. तसे झाले तरच
सुरक्षेची भावना वाढू शकेल.
पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी माओग्रस्त भागांमध्ये एक सर्वेक्षण, तपासणी करून किती मुली आणि बायकांना माओवाद्यांनी पळवून नेले आहे याची माहिती एकत्र करावी. त्यानंतर अर्थातच त्यांना माओवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न सरकार आणि सुरक्षा दलांनी करावा.
लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे देशभक्त सामान्य नागरिकांचे पण काम आहे. माओवादी हिंसाचाराच्या मागे उभ्या राहणाऱया तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल.

– [email protected]