संख्यावाचनातला समजुतीचा घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

इयत्ता दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात संख्यावाचनात केलेल्या बदलावरून वाद निर्माण झाला आहे. काहींनी त्याचे समर्थन केले आहे तर काहींनी हा मारक निर्णय असल्याचे म्हटले आहे. खरे म्हणजे हा बदल नीट समजून न घेतल्याने टीका सुरू झाली. याबाबत शिक्षणतज्ञ आणि साहित्यिकांनी मांडलेली भूमिका.

शाळांचे नवीन वर्ष सुरू झाले की मुलांचा उत्साह, नवीन पुस्तके, अभ्यास याविषयी वेगवेगळय़ा बातम्या येत असतात. यावर्षी मात्र बदललेला अभ्यासक्रम, चुकीची छपाई असलेली पुस्तकं, शाळाप्रवेशावरून निर्माण झालेले वाद या चर्चांबरोबरच एक वेगळी चर्चा रंगली. ती म्हणजे गणिताच्या नकीन पुस्तकातील संभ्रमात टाकणारा बदल. बालभारतीकडून दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात एक बदल करण्यात आला आहे. तो करण्यामागे मुलांना गणिताबद्दल आकड निर्माण क्हाकी, संख्या काचन सोपे क्हाके हा हेतू आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून हा बदल करण्यात आला आहे. जोडाक्षर काचताना किद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते म्हणून हा बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.

हा बदल नवीन नाही.
हा बदल गेल्या वर्षी पहिलीपासूनच सुरू केला आहे. हे अनुकरण नसून ते सोपे वाटले म्हणून घेतले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणे हा उद्देश आहे. केवळ 21 ते 99 पर्यंतच हा बदल असून, इतर जोडाक्षरे बदलण्याबाबत आम्ही काहीच बोललो नाहीत. मुलांना जर जोडाक्षरे टाळून वीस एक सोपे वाटत असेल तर त्यांना उत्तेजन द्या असे आम्ही शिक्षकांना सुचवले आहे. सत्याऐंशी याची संख्या लिहिताना अनेक मुले आधी 7 आणि नंतर 8 लिहितात. मोठी माणसे चुका करतात. यामध्ये जर भाषा बदलली नाही तर सुधारणा कशी होणार?
– डॉ. मंगला नारळीकर,

बालभारतीच्या गणित विषयतज्ञ समितीच्या अध्यक्ष अनावश्यक वाद
हा वाद जोडाक्षरे, दाक्षिणात्य भाषा असे अनावश्यक मुद्दे टाकल्यामुळे उद्भवला आहे. दोन अंकी संख्या लिहिताना आणि वाचताना त्यांच्या अंकांच्या स्थानिक किमती समजणे सोपे व्हावे, हा उद्देश आहे, एवढेच ठामपणे सांगायला पाहिजे होते.
– वसंत काळपांडे, शिक्षणतज्ञ

बदलास विरोध
माझा या बदलाला विरोध आहे. ग्रामीण भागात शाळेत न गेलेल्या महिलांनासुद्धा शंभरपर्यंत आकडे येतात. उत्तर हिंदुस्थानात ळ नाही म्हणून आपण ळ रद्द करायचा का? ज्ञानेश्वरांची, नामदेव आणि तुकोबांची मराठी संपवू नका. सुप्रीम कोर्टाने दहावीपर्यंत मराठी सक्तीची करण्यास परवानगी दिली आहे. अमराठी लोकांसाठी सोपा अभ्यासक्रम तयार करा. तो संवादात्मक असावा. 90 टक्के मराठी मुलांना सरकारी नोकऱया मिळणार नाहीत. स्वबळावरच जगण्याचे सामर्थ्य मातृभाषा देते.
– रामदास फुटाणे, कवी-साहित्यिक

निर्णयाचे स्वागत
संख्यावाचनाच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. पालकांना, मुलांना मराठी आकडे लिहिताना अडचणी येतात. गणिताबद्दल विनाकारण भीती निर्माण झालेली दिसते. त्यामुळे मुलांची मानसिकता समजून घेऊन हा बदल करण्यात आला आहे. साहित्यिकांचा थेट गणिताशी संबंध नसल्याने त्यांनी विरोध करण्याला अर्थ नाही.
– लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

बदल पहिलीपासून हवा
हा बदल चांगला आहे. पण तो चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. आपण दोनावर तीन तेवीस म्हणतो हे अशास्त्रीय आहे. वीस तीन हे बरोबर वाटते. मुलांना ते समजायला सोपे आहे. पण हा बदल पहिलीपासून हवा. सर्व स्तरातून त्याचा स्वीकार झाला पाहिजे. यापूर्वी असे बदल झाले आहेत.
– फारूक काझी, शिक्षक सांगोला

इच्छाशक्ती गरजेची
अशाप्रकारचा बदल केवळ पाठय़पुस्तकांत येणे पुरेसे नाही. कारण पाठय़पुस्तकांचा संबंध केवळ शाळा, मुले आणि शिक्षक यांच्याशी आहे. नव्या संकेतांनुसार शिकणाऱया मुलाने दुकानात गेल्यावर ‘तीस सात किलो तांदूळ द्या’ अशी मागणी केली किंवा कंडक्टरला ’दोन तिकिटांचे दोनशे तीस नि आठ झाले ना? असा प्रश्न आज विचारला तर गोंधळ माजेल. कारण जुनी संख्यानामे समजून घ्यायला आपण इतके सरावलो आहोत की ती आपल्याला मुद्दाम विचार करून समजून घ्यावी लागत नाहीत. नवे संकेत मात्र पदोपदी विचार करायला भाग पाडणार. अशाप्रकारचे बदल करणे ही केवळ शैक्षणिक बाब नसून तो एक सामाजिक आणि राजकीय निर्णय आहे. म्हणून या प्रकारचा बदल करण्याची गरज बहुतेकांना पटल्याशिवाय तो प्रत्यक्ष येणे अवघड आहे. बालभारतीने मुलांना केंद्रस्थानी ठेवून हा बदल करण्याचे धाडस दाखवले आहे. मात्र हे बदल टिकण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणे अत्यंत गरजेचे आहे.
– नीलेश निमकर, गणित शिक्षक

[email protected]