
सामना ऑनलाईन । मुंबई
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 ची वाटचाल आता सेमीफायनलकडे सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि हिंदुस्थान हे पहिले तीन संघ जवळपास पक्के झाले आहेत. चौथ्या स्थानासाठी इंग्लंड, श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तान या चार संघांमध्ये चूरस आहे. गेल्या चार लढतींचा निकाल पाहिल्यानंतर वर्ल्डकपची रंगत वाढत असल्याचे दिसून आले आहे. वर्ल्डकप जसा पुढे सरकेल तशी ही रंगात आणखी वाढताना दिसेल.
जाधव-धोनीच्या संथ फलंदाजीवर सचिनने ओढले आसूड, म्हणाला…
वर्ल्डकपमधील ‘हॅटट्रिक’वीर,हिंदुस्थानच्या 2 गोलंदाजांचा समावेश
गेल्या चार लढती शेवटच्या षटकापर्यंत रंगल्या आणि थरारक झाल्या. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या षटकांमध्ये 4 विकेटने पराभव केला, त्यानंतर श्रीलंकने यजमान आणि वर्ल्डकपचा दावेदार असणाऱ्या इंग्लंडला 20 धावांनी पराभूत केले. शनिवारी हिंदुस्थानने अफगाणिस्तावर 11 धावांनी थरारक विजय मिळवला आणि त्यानंतर झालेल्या लढतीत न्यूझीलंडने वेस्ट इंडीजचा 5 धावांनी रोमहर्षक पराभव केला. बांग्लादेशने देखील ऑस्ट्रेलियाला विजयासाठी झुंझवले. शेवटपर्यंत रंगणाऱ्या लढतींमुळे निरस वाटणाऱ्या वर्ल्डकपमध्ये प्राण फुंकले गेल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
beat by four wickets with three balls remaining
beat by 20 runs
beat by 11 runs
beat by 5 runs4️⃣ days, 4️⃣ #CWC19 thrillers. Which one was your favourite? pic.twitter.com/1ALnr1iaAT
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 23, 2019
या संघांनी गुंडाळला गाशा
वर्ल्डकप सुरू होताना दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदा तरी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यांच्यावर लावण्यात आलेला चोकर्सचा शिक्का त्यांनी पुसू दिला नाही. वर्ल्डकपमधून अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीजपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेनेही गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे पुढच्या लढती त्यांच्यासाठी औपचारिकता असल्या तरी विरुद्ध संघासाठी महत्त्वाच्या असणार आहे. गाशा गुंडाळलेले संघही अखेरच्या लढतींमध्ये विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील.
























































