
सामना प्रतिनिधी । पुणे
माऊली माऊली… गणपती बाप्पा मोरया… जय गणेश…च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला थेट सभामंडपात जाऊन अनोखी मानवंदना दिली.
कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून मंगळवारी दुपारी 4 वाजता प्रस्थान होणार आहे.




























































