
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मॅनचेस्टरमध्ये टीम इंडियाचा वेस्ट इंडीजचा सामना रंगत आहे. या लढतीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 20 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर जमा झाला आहे.
Mt. 20k scaled! @imVkohli becomes the quickest batsman to make 20,000 international runs. He is the third Indian after @sachin_rt and Rahul Dravid to achieve this feat. #TeamIndia #CWC19 #KingKohli pic.twitter.com/s8mn9sgaap
— BCCI (@BCCI) June 27, 2019
याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 20 हजार धावा बनवण्याचा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तेंडुलकर आणि लाराने 453 डावांमध्ये 20 हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. तर रिकी पॉन्टिंगने 468 ड़ावांमध्ये हा टप्पा गाठला होता. विराट कोहलीने हा टप्पा 418 व्या डावात (131 कसोटीस 225 वन डे आणि 62 टी-20) पार केला आहे. इंडीजविरुद्ध विराटने 37 वी धाव घेताच त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 20 हजार धावांची नोंद झाली.



























































