आता या अभिनेत्रीलाही ब्रेस्ट कॅन्सर, ट्विटरवरून दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनाली बेंद्रे, ताहिरा कश्यप, ऋषी कपूर यांच्यानंतर आता कर्करोगाशी लढणाऱ्या कलाकारांमध्ये अजून एका अभिनेत्रीची भर पडली आहे. हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन अभिनेत्री असलेली शीतल सेठ हिने नुकतीच तिच्या आजाराची कल्पना ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

sheetal-shet

शीतल सेठ ही दी वर्ल्ड अनसीन नावाच्या शोमधून अभिनेत्री लिजा रेसह झळकली होती. शीतलने तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट तिच्या चाहत्यांसाठी शेअर केली. या पोस्टमध्ये तिने तिच्या कर्करोगाच्या प्रवासाविषयीही माहिती दिली आहे. सहा महिन्यांपूर्वी तिला स्तनांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. तिने त्यासंबंधीच्या प्रश्नांनाही या पोस्टच्या माध्यमातून उत्तरं दिली आहेत. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मला खूप धक्का बसला होता. पण या लढाईत मी अजूनही लढतेय आणि लढत राहीन, असं शीतल हिने म्हटलं आहे. लिजा रे हिने तिचं ट्वीट रिट्वीट करून तिला योद्ध्याची उपमा दिली आहे.

लिजा रे हीसुद्धा कॅन्सर सर्व्हायव्हर असून 2009मध्ये तिला मल्टिपल मायलोमा नावाच्या एका दुर्मीळ कर्करोगाने ग्रासलं होतं. 2010मध्ये अमेरिकेहून उपचार घेऊन परत आलेल्या लिजाने आता आपण कॅन्सरमुक्त असल्याचं म्हटलं होतं.