
सामना ऑनलाईन । बिजापूर
छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तीन सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत एक मुलगी देखील मृत्युमुखी पडली आहे.
बिजापूरमधील केशकुटुल गावात सीआरपीएफचे जवान व स्थानिक पोलिसांचे पथक संयुक्तरित्या गस्तीसाठी निघालेले असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबारात तीन जवान शहीद झाले तर एक जण जखमी झाला. तसेच गोळीबारात दोन मुलीही जखमी झाल्या होत्या. त्यातील एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.























































