
सामना प्रतिनिधी । मुंबई
चरस, कोकेन, गर्द, एलसीडी, नशेच्या गोळ्याची विक्री करणाऱयाला गुन्हे शाखेच्या युनिट 8 ने गजाआड केले. जावेद समशेर अलीसिद्धीकी असे त्याचे नाव आहे.
अंधेरीच्या मरोळ परिसरात एक जण अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती युनिट 8 ला मिळाली. त्या माहितीची शहनिशा पोलिसांनी केली. पोलीस निरीक्षक अरुण पोखरकर यांच्या पथकातील महेश तोगरवाड, विचारे, देवकर, यांच्या पथकाने तपास सुरु केला. आज पोलिसांनी सापळा रचून जावेदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 5 ग्रॅम कोकेन, 38 ग्रॅम एमडी, 45 ग्रॅम चरस, 21 नशेच्या गोळ्या, 12 एलसीडी स्टिकर, 5. 5 ग्रॅम गर्द पावडर जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थाची किमंत 3 लाख 47 हजार रुपये इतकी आहे. जावेद विरोधात सहार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा पुढील तपास युनिट 8 करणार आहे.



























































