यंदा आषाढीला होणार जास्तीतजास्त भाविकांना दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढीवारीच्या महासोहळ्याची प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरु आहे. वारीनिमित्त आलेला प्रत्येक वारकरी भाविक चंद्रभागेचे स्नान आणि श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आनंदाने परतला पाहिजे, यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले पंढरपूरमध्ये तळ ठोकून आहेत. यावर्षी कमी वेळेत जास्तीतजास्त भाविकांना विठूरायाचे दर्शन मिळावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी सुनील उंबरे यांनी…