
सामना ऑनलाईन। खालापूर
खालापुर तालुक्यातील बीड गावात एका घराला लागलेल्या आगीत घर जळून खाक झाले असून आई व मुलगा बेपत्ता आहेत. तर मुलगी व वडील सुखरूप आहेत.
रंजना कर्णुक पाटील असे बेपत्ता महिलेचे नाव असून मुलाचे नाव सनिल आहे.
बीड गावात भानुदास पाटील कुटुंबीय राहते. बुधवारी रात्री दिडच्या सुमारास अचानक त्यांच्या घऱाला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही कळण्याच्या आतच आगीच्या ज्वाळांनी घराला चारही बाजूने घेरले. यावेळी स्नेहा भानुदास कर्णुक पाटील (१९) हीने प्रसंगावधान बघत वरच्या मजल्यावर धाव घेतली व बाल्कनीतून खाली उडी मारली. तर भानुदास कामावर असल्याने बचावले. पण घरात झोपलेल्या भानुदास यांच्या पत्नी रंजना व त्यांचा मुलगा सनिल यांचा काहीच अत्तापत्ता नाही. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच खोपोली पोलीस, फायर ब्रिगेड, HP फायर ब्रिगेड यांच्यासह गावातील तरुणांनी पाटील कुटुंबीयाच्या घराकडे धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले.
































































