आदित्य ठाकरे सोलापूर दौऱ्यावर, आष्टी उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोलापूर

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दुपारी आदित्य ठाकरे सोलापूरमध्ये पोहोचल्यावर त्यांचे कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने स्वागत केले. सारोळे, सोलापूर येथे आष्टी उपसा सिंचन योजना टप्पा क्र-2 चे आदित्य ठाकरे यांनी भूमिपूजन केले. यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.

23 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प आदित्य ठाकरे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा प्रगतीपथावर आला आहे. या प्रकल्पाचा फायदा सारोळा, पोखरापुर, खवणी, कोन्हेरी या गावातील लोकांना होणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी सारोळे, सोलापूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.