
सामना प्रतिनिधी । पुदुचेरी
चेन्नईतील पाणीप्रश्नावरून तामीळनाडू सरकार आणि लोकांविरोधात पुद्दुचेरीच्या उपराज्यपाल किरण बेदी यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ गुरुवारी अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी तीक्र निदर्शने केली. बेदी यांचे विधान अत्यंत अपमानकारक आणि हीन दर्जाचे आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारने पुद्दुचेरीच्या उपराज्यपालपदावरून पायउतार करावे, अशी मागणी अण्णाद्रमुकचे नेते ए. अंबालगन यांनी केली.
























































