चिपळूणात वशिष्ठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, बाजारपेठ पाण्यात 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुसळधार पावसाने चिपळूण तालुक्याला झोडपले असून वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. चिपळूण शहर जलमय झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वशिष्ठी नदीचे पाणी बाजारपूलावर आल्याने पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली. शिवनदी पुलावरही पाणी आले आहे. चिपळूणातील बहाद्दुरशेख पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. चिपळूण शहरात पुर आला असून व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे.