
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकमुळे दहशतवाद्यांची तंतरली आहे. पाकिस्तानमध्ये बसून दहशतवाद्यांची फॅक्टरी चालवणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोएबा यांनी एअर स्ट्राईकनंतर हिंदुस्थानी सीमारेषेजवळ असणारे दहशतवादी तळ हलवण्याची तयारी केली आहे. यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या दहशतवादी संघटनांमध्ये हातमिळवणी झाले वृत्त ‘एएनआय’ या संस्थेने सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दिले आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद याची संघटना लश्कर-ए-तोएबा आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अझहरची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने अफगाणिस्तानातील सक्रीय दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कर आणि अफगान तालिबानसोबत हातमिळवणी केली आहे. अफगाणिस्तानच्या दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून हाफिज आणि मसूद आपले दहशतवादी तळ कांधार आणि कुनार जवळील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हलवत आहेत.
Pak-based terrorists joining hands with Afghan outfits after Balakot strike
Read @ANI story | https://t.co/Qs73qtW5XE pic.twitter.com/dYZYSRXPE1
— ANI Digital (@ani_digital) July 8, 2019
आंतरराष्ट्रीय दबाव आणि पाकिस्तान
पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकून पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याचे ठऱवले. सध्या पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये आहे. या संस्थेने पाकिस्तानने मनी लॉन्डिंग आणि टेरर फडिंगविरोधाक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. अन्यथा पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल. एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी पाकिस्तान हे सर्व करत आहे.


























































