ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मैदानावर अनवाणी फिरले !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी यजमान इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या साखळी लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे पुन्हा लयीमध्ये येण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी एक नवा फंडा वापरला. नेट सरावाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सर्व खेळाडूंना मैदानावर अनवाणी फिरण्याचा सल्ला दिला.

मैदानावर अनवाणी पायांनी केवळ खेळाडूच नाही, तर सर्व सपोर्ट स्टाफही फिरला. अनवाणी फिरल्याने शरीराला उर्जा आणि लय मिळते. अनेक हॉलीवूड नायक आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या रग्बी संघानेही ऊर्जा मिळविण्यासाठी आणि ताण घालविण्यासाठी अनेकदा हा फंडा वापरलेला आहे.