शौचालयाकडे जाताना भिंत अंगावर पडून मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

आठ वर्षाचा मुलगा शौचालयाकडे निघालेला असताना त्याच्या अंगावर संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सवा सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

रत्नागिरी तालुक्यातील पावस खारवीवाड्यातील सुरज सागर वडपकर (8) हा सायंकाळी शौचालयाला निघालेला असताना संरक्षक भिंत त्याच्या अंगावर पडून त्याचा दुर्देवी मृत्यु झाला. सुरज हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. या दुर्दैवी घटनेने वडपकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.