
सामना प्रतिनिधी । मुंबई
पालिकेच्या मालमत्तांचा विकास स्वतः करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून यातून प्रकल्पग्रस्तांसाठी घरे, ऑफिस आणि हब सुरू करता येणार आहेत. विक्रोळी येथे सुरू केलेल्या विकासाच्या धर्तीवर पालिका हे धोरण राबवणार असल्याची माहिती उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी सुधार समितीत दिली.
पालिका आपल्या मालमत्तांचा, मार्केटचा विकास कंत्राटदाराच्या माध्यमातून करते, मात्र पालिकेने स्वतःच विकास केल्यास पालिकेचा खर्च वाचेल व पालिकेचा फायदा होईल अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर माहिती देताना उपायुक्त चौरे यांनी या पद्धतीने सर्व ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून विकास करणे शक्य आणि व्यवहार्य ठरत नसले तरी विक्रोळी येथील भूखंडाचा आणि भायखळा राणी बाग मराठा कंपाऊंड येथील पालिका वसाहतीचा विकास स्वतःच करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याचे त्यांनी सांगितले. या मालमत्ता विकासात पालिकेला चांगले यश आले तर यापुढे पालिकेच्या माध्यमातून स्वतः विकास करण्याचे धोरण मोठय़ा प्रमाणात राबवता येईल, असे ते म्हणाले.
परिणामांचा अभ्यास करूनच निर्णय
पालिकेने यापूर्की भोईकाडा येथील मालमत्तेचा विकास स्वतःच करण्याचे काम 2003 च्या सुमारास हाती घेतले होते, मात्र 2016 पर्यंत त्यात काहीच प्रगती झाली नाही. तसेच संबंधित प्रकरण कोर्टात गेले. या किकासकामामधून पालिकेला 600 कोटींचा लाभ होणार होता, मात्र कोर्टात प्रकरण गेले असल्याने भाडेकरू आजही संक्रमण शिबिरात खितपत पडले असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे पुढील काळात त्या त्या विभाग-ठिकाणच्या परिस्थितीनुसार निर्माण होणार्या परिणामांच्या सर्वंकष अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागेल, असेही चौरे म्हणाले.























































