प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 29 जुलैपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

खरीप हंगाम 2019 मध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱयांना सहभागी होता यावे यासाठी 29 जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी दिली. योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱयांचे विमा अर्ज बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) येथे स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱयांनी या योजनेअंतर्गत पीक किमा संरक्षण मिळवण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषी अधिकारी कृषिमंत्र्यांनी केले आहे.

तरी शेतकऱयांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळवण्यासाठी विहित मुदतीपूर्वी नजीकची बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.