
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना गुरुवारी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे. दादर-माटुंगादरम्यान डाऊन दिशेच्या धिम्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे डाऊन दिशेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.

























































