कश्मीर खोऱ्यात मोठ्या हल्ल्याची शक्यता, अतिरिक्त दहा हजार जवान तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने कश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याचा प्लान आखल्याचे समोर आले आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने निमलष्करी दलाचे अतिरिक्त 10 हजार जवान कश्मीर खोऱ्यात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे दोन दिवसांच्या जम्मू कश्मीर दौऱ्यावर गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावून कश्मीर खोऱ्यात निमलष्करी दलाच्या 100 तुकड्या म्हणजेज अतिरिक्त दहा हजार जवान तैनात करण्यात आले.