
सामना प्रतिनिधी, रत्नागिरी
चिपळूण तालुक्यात परशुराम घाटात दरड कोसळल्याने ठप्प झालेला मुंबई-गोवा महामार्ग 16 तासानंतर सुरू झाला आहे. शनिवारी रात्रभर दरड हटविण्याचे काम सुरु होते. शनिवारी दुपारी तीन वाजता मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळून ही घटना घडली होती. रविवारी सकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी परशुराम घाटात जाऊन पाहणी केली.

























































