तिहेरी खून प्रकरणी हलगर्जी भोवली; पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, बीड

बीडमधील तिहेरी हत्याकांड प्रकरणी तक्रार दाखल होऊनही वेळीच उपाययोजना करत प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी बीड शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक मनीषा जोगदंड आणि पोलिस कर्मचारी वंजारे या दोघांना तातडीने निलंबित केले आहे. पोतदार यांनी बीड येथे चार्ज घेतल्यानंतर आपला खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.

बीडमध्ये पिंपरगव्हाण वस्तीवर शेतीच्या वादातून तीन सख्ख्या भावांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही पक्षांनी मिळून एकमेकांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणी अदखलपात्र नोंद घेऊन प्रकरण चौकशीवर ठेवले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली असती तर हा अनर्थ टाळता आला असता.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड आणि पोलिस कर्मचारी वंजारे या दोघांना पोलीस अधीक्षक खर्च पोतदार यांनी तातडीने निलंबित केले आहे पोलीस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. जबाबदारीने काम करा अन्यथा घरी बसा, असा संदेश अधीक्षकांनी दिला आहे.