
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अबिगेल पांडे हिच्या एका फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. अबिगेल हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून टॉपलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अबिगेल योगा करताना दिसत आहे. फोटोसोबत तिने बोल्ड कॅप्शनही शेअर केले आहे.
न्यूड मुलगी योगा करत आहे हे मी शब्दातही व्यक्त करू शकत नाही. अनेकांनी ही पोस्ट आवडणारही नाही. परंतु आपल्याला हे माहिती आहे की जी व्यक्ती स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न करते ती तुम्हाला चांगली हेडलाईन्स आणि टायटल्स देऊ शकते. आपल्याला हे माहिती नाही का की एखाद्या पुस्तकाचा शेवट त्याच्या कव्हर पेजवरून ठरवणे योग्य नाही, असे कॅप्शन अबिगेल हिने आपल्या पोस्टला दिले आहे.
ती पुढे लिहिते, न्यूड आणि योगा यामध्ये काहीही समानता नाही. परंतु जी लोकं नवनवीन प्रयत्न करतात त्यांची वेगळी दुनिया असू शकते. हा फोटो क्लिक करण्यापूर्वी मला लाज आणि भितीही वाटत होती, परंतु यामुळे मला स्वतंत्र झाल्यासारखे वाटले. तसेच मला लोक काय विचार करतील याची भिती वाटत होती. परंतु माझे मित्र आशका गोराडिया, फोटोग्राफार आणि माझ्या सुरक्षारक्षकानेव मला हिम्मत दिली. लोक काय करतील याचा तू विचार करू नकोस असा सल्ला त्यांनी मला दिला. त्या एका क्षणात मी सर्व काही विसरले. मला माहिती होते माझ्याशिवाय मला कोणीही पाहात नाहीये. त्या एका क्षणासाठी मला सर्वकाही विसरायचे होते, ही माझी कथा आहे, तुमची काय आहे? असा सवालही अबिगेल हिने चाहत्यांना विचारला आहे.




























































