दाऊदच्या पुतण्याला ‘मोक्का’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकर याच्यावर मुंबई पोलिसांनी सोमवारी ‘मोक्का’अन्वये कारवाई केली. गुन्हे शाखेने रिझवानला खंडणी प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली.  रिझवान हा दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरचा मुलगा आहे. दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याला दाऊदचा हस्तक फईम मचमच याच्याकरवी खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने रिझवान, रझा वधारिया आणि एका व्यापाऱ्याला पकडले होते.