
सामना ऑनलाईन, मुंबई
तृणमूल काँग्रेस कार्यकर्ता मनोरंजन पात्राच्या हत्ये प्रकरणी आरोपीला कांदिवली परिसरातून अटक केली. राजा माना उर्फ राजिब माना असे त्याचे नाव आहे. कांदिवली पोलिसांच्या मदतीने ही कोलकाता पोलिसांनीकारवाई केली. याप्रकरणी खानकूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. खानाकुल पोलिसांनी तपास करून या पूर्वी आठ आरोपीना अटक केली होती. पोलीस राजिबचा शोध घेत होते. रविवारी कांदिवली पोलिसांच्या मदतीने खानाकुल पोलिसांनी राजिबला ताब्यात घेतले.


























































