
सामना प्रतिनिधी । परभणी
शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या शुक्रवारी जन आशिर्वाद यात्रेनिमित्त परभणी जिल्हा दौर्यावर येत असून त्यांच्या आगमनामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील चार ही विधानसभा मतदार संघात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदित्य ठाकरे यांच्या दौर्याची सुरुवात पालम येथून सकाळी ११ वाजता होणार असून पालम येथे युवक व शेतकरी बांधवांशी संवाद साधारणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता गंगाखेड येथील साई वृंदावन मंगल कार्यालयात विजय संकल्प मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत.
दुपारी २ वाजता पाथरी मतदार संघातील पोखर्णी येथील शेतकरी व युवकांशी संवाद दुपारी ३ वाजता शिवाजी चौक, पाथरी येथे शहरातील युवक व नागरिकांशी संवाद साधाणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता मानवत येथील नेहा मंगल कार्यालयात विजयी संकल्प मेळावा होणार आहे.



























































