
सामना प्रतिनिधी । हिंगोली/नांदेड
हिंगोली जिह्यात शुक्रकारच्या रात्रीपासून पाचही तालुक्यांत संततधार पाऊस बरसत असून कयाधू, पैनगंगा कोपल्या आहेत. कळमनुरी तालुक्यात पूल खचल्याने 35 गाकांचा हिंगोली क कळमनुरीशी संपर्क तुटला आहे. नांदेड जिह्यातील हिमायतनगर तालुक्यात जोरदार पावसाने नद्या दुथडी भरून वाहत असून विदर्भ-मराठवाडय़ास जोडणार्या गांजेगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हिंगोली जिह्यात जोरदार पाऊस पडत असून हिंगोली शहराजकळ असलेल्या कयाधू नदीला प्रथमच पूर आला आहे. नांदेड जिल्हय़ात लागोपाठ तिसर्या दिवशीही दमदार पाऊस पडत असल्याने तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही.




























































