
सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क्
अमेरिकेतील टेक्सास शहरातील वॉलमार्ट स्टोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री केलेल्या बेछूट गोळीबारात 20 जण ठार झाले असून 26 हून अधिकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे एखाद्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का याचा शोध पोलीस घेत असून एकापेक्षा जास्त हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ,अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच या हल्ल्यासंदर्भातील माहितीसाठी आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे टि्वट त्यांनी केले आहे.
टेक्सासचे लेफ्टनंट गव्हर्नर डॅन पॅट्रीक यांनीदेखील या ह्लल्याच्या माहितीला दुजोरा दिला असून हल्ल्यात 15 ते 20 जण मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या स्टोअरमध्ये एका आठवड्यात गोळीबार होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियातील गिलरॉयमध्ये गार्लिक फेस्टीवलमद्येही गोळीबार करण्यात आला होता. यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच जून
महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही टेक्सासमध्ये गोळीबार झाल्याच्या दोन घटना घडल्या. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर दोन जण जखमी झाले होते.
‘God be with you all’: Trump pledges full support for El Paso shooting victims as lawmakers also grieve https://t.co/gISsidBeWr via @usatoday
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 3, 2019


























































