
सामना ऑनलाईन । ढाका
‘आरएसएस’च्या जातीयवादी विचारसणीतूनच भाजपाने 370 कलम हटविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आणखी एक पुलवामासारखा हल्ला होईल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. ही धमकी गळय़ाशी येऊ शकते हे लक्षात येताच इम्रान खान यांनी सारवासारव केली आणि पुलवामाशी पाकिस्तानचा संबंध नव्हता, असे सांगितले.
























































