
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
निवडणूक कोणतीही असो, त्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगवेगळय़ा युक्त्या वापरतात. पण एकमेकांच्या विरोधात लढणाऱया उमेदवारांनी घोडेबाजार करणार नाही, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार नाही, अशी स्वतःच आचारसंहिता लागू करण्याचा प्रकार विरळाच! पण हा आदर्श घालून दिला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे व काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांनी!
संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ही निवडणूक निर्भेळ व पारदर्शक वातावरणात व्हावी, कोणत्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब होऊ नये यासाठी शिवसेनेचे नगरसेवक राजू वैद्य यांनी पुढाकार घेतला. राजू वैद्य यांनी दोन्ही उमेदवारांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले. अंबादास दानवे व बाबुराव कुलकर्णी यांच्यात निवडणूक निकोप व्हावी यावर सखोल चर्चा झाली. त्यानंतर दोघांनीही घोडेबाजार करायचा नाही, भ्रष्ट मार्गाचा अवलंब करायचा नाही असे ठरवले आणि लगेच संयुक्त पत्रकही काढले.
अंबादास दानवे व बाबुराव कुलकर्णी या दोघांनी काढलेल्या संयुक्त पत्रकात ‘‘आम्ही उमेदवार सर्क मतदारांपर्यंत आपापल्या पद्धतीने संपर्क साधून आपला पक्ष, आपली किचारसरणी, आपापले सामाजिक-राजकीय कार्य याची माहिती देत आहोत आणि आम्ही केलेल्या कामांची दखल घेऊन आम्हाला मतदान कराके, असे आकाहन आम्ही मतदारांना करीत आहोत. मतदारांनीही लोकशाहीच्या मजबुतीसाठी, पारदर्शक निकडणूक व्हावी यासाठी आम्हास सहकार्य करावे,’’ असे आवाहन केले आहे.

























































