मोदी शाह यांची जोडी कृष्ण अर्जुनासारखी, सुपरस्टार रजनीकांतची स्तुतीसुमने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

कलम 370 हटवल्यानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची प्रशंसा केली आहे. दोघांची जोडी कृष्ण अर्जुनासारखी आहे अशी स्तुतीसुमने रजनीकांत यांनी उधळली आहेत. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कार्यकाळाचे दोन वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

रजनीकांत म्हणाले की, “मिशन कश्मीर यशस्वी झाल्याने दोघांचे अभिनंदन, अमित शाह यांचे कश्मीरवरील भाषण शानदार होते. त्यासाठी सलाम.”  तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी कृष्ण अर्जुनासारखी काम करते. आपल्याला नाही माहित की या पैकी कृष्ण कोण अर्जून कोण हे त्यांनाच माहित आहे असेही रजनीकांत यावेळी म्हणाले.