
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय लढतीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार शतकी खेळी केली. या दरम्यान विराटने 78 वी धाव घेताच टीम इंडियाचा ‘दादा’ माजी कर्णधार सौरव गांगुलीच याचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट आता दुसरा क्रमांकावर पोहोचला आहे.
विराट कोहलीचा धमाका, जावेद मियाँदाद यांचा 26 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला
सौरव गांगीलीने 311 आंतरराष्ट्रीय एक दिवसीय लढतीत 300 डावात फलंदाजी करताना 11363 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 22 शतकांचा आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. रविवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत विराटने 238 व्या लढतीत गांगुलीचा हा विक्रम मोडला आहे. 30 वर्षीय विराटने इंडीजविरुद्ध 78 वी धाव घेताच गांगुलीला मागे सोडले. या लढतीत विराटने 120 धावांची शतकी खेळी केली.
Virat Kohli brings up his 42nd ODI ton
How many more runs will India add?
FOLLOW #WIvIND LIVE https://t.co/TiRx4S3IQb pic.twitter.com/Bc8LC7ugnX
— ICC (@ICC) August 11, 2019
आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट आता आठव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत हिंदुस्थानचा सचिन तेंडुलकर 18426 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर कुमार संघकारा 14234 धावांसह दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग 13704 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

























































