मंदीच्या बैलाला ढोल!एका महिन्यात हिंदुस्थानींनी केला 596 दशलक्ष डॉलर्सचा परदेशवारीवर खुर्दा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहन उद्योगासह मंदीचे वातावरण असले तरी खरोखर देशात आर्थिक मंदी आहे का, असा प्रश्न पडला आहे. कारण केवळ एका महिन्यात जूनमध्ये हिंदुस्थानींनी परदेशवारीवर तब्बल 596 दशलक्ष डॉलर्सचा खुर्दा केला आहे. हिंदुस्थानींकडून परकीय चलन खर्च वाढत असताना परदेशी सहलींवरील खर्चही वाढत आहे.

रिझर्व्ह बँकेने उदारीकरणाची रेमिटन्स योजनेअंतर्गत डाटा जमविण्यास सुरुवात केल्यापासून एक महिन्यात हिंदुस्थानींकडून परदेशवारीवर झालेला हा सर्वाधिक खर्च आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने माहिती प्रसिद्ध केली आहे.

किती झाला खर्च…
z या वर्षी जूनमधील प्रवासातील खर्च हा हिंदुस्थानी व्यक्तींनी खरेदी केलेल्या विदेशी वस्तूंच्या 42 टक्के इतका होता. z या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत हिंदुस्थानींनी विदेशी वस्तूंच्या खरेदीसाठी 4181 दशलक्ष डॉलर्स खर्च केले. त्यातील 1594 दशलक्ष डॉलर्स परदेशी वारीसाठी खर्च केले. z गेल्या वर्षी एप्रिल ते जून 2018 मध्ये 1 अब्ज डॉलर्स परदेशी प्रवासासाठी खर्च केले होते. z चालू आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये आतापर्यंत परदेशवारीसाठी हिंदुस्थानींनी एकूण 13.8 अब्ज डॉलर्स खर्च केले.

परदेशवारी करणाऱयांची संख्या 5 कोटींवर जाणार
जागतिक पर्यटन संघटनेच्या आकडेवारीनुसार 2017 मध्ये परदेशवारी करणाऱयांची संख्या 2.40 कोटी होती. या वर्षी डिसेंबर 2019 पर्यंत 5 कोटी हिंदुस्थानी परदेशवारी करतील असा अंदाज आहे. अर्थात हिंदुस्थानच्या लोकसंख्येचा विचार केल्यास ही संख्या केवळ 4 टक्के आहे.

प्रति व्यक्ती अडीच लाख डॉलर्स खर्च करण्याची मुभा
रिझर्व्ह बँकेने उदारीकरणाची रेमिटन्स योजना 2004 मध्ये सुरू केली तेव्हा हिंदुस्थानींना परदेशात दरवर्षी 25 हजार डॉलर्सपर्यंत खर्च करण्याची मुभा होती. ही मर्यादा वाढवत नेण्यात आली आहे. आता प्रति व्यक्ती परदेशवारीसाठी अडीच लाख डॉलर्सपर्यंत खर्च करू शकते