अरुण जेटली यांची प्रकृती नाजूक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे एम्समध्ये दाखल करण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एम्समध्ये जाऊन अरुण जेटली यांची भेट घेतली.

9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेटली यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर उपचार करणाऱया डॉक्टरांनी जेटली यांची प्रकृती सामान्य असल्याचे सांगितले होते, परंतु नंतर त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.