
भारतरत्न सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. नागपूरमध्ये पाच सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱया ‘बापुना कप’साठी मुंबईच्या 15सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादवकडे मुंबईच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
मुंबईचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, जय बिस्टा, सर्फराज खान, शुभम रांजणे, रोनक शर्मा, एकनाथ केरकर, सुफियान शेख, आकाश पारकर, शम्स मुलानी, आदित्य धुमाळ, शशांक अटार्डे, आकिब कुरेशी, कृतिक हनागावाडी, अर्जुन तेंडुलकर.
























































