दहावी पुरवणी परीक्षेचा २८.२५ टक्के निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ssc-exam
प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै – ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यात संभाजीनगर विभागाचा निकाल 28.25 टक्के लागला असून, विभागातील 19 हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल 30.8 टक्के लागला आहे.
शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी संभाजीनगर विभागातून 28 हजार 171 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 26 हजार 499 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत यापैकी 7 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागाचा एवूâण निकाल 28.25 टक्के लागला आहे. गतवर्षाच्या निकालाच्या तुलनेत उत्तीर्ण विद्याथ्र्यांचा टक्का घसरला आहे. गतवर्षी 32.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. आता हा निकाल 28 टक्के लागला आहे. या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी 16 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.
दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्याथ्र्यांच्या गुणपत्रिकेचे वितरण स्वतंत्र तारीख जाहीर करून विद्यालयांना देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी शनिवार 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाकडे गुणपडताळणी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे. अर्जासोबत ऑनलाइन निकालाची प्रत गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे.
जिल्हानिहाय निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संभाजीनगर विभागीय कार्यालयाअंतर्गत पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यांचा निकाल एकूण 28.25 टक्के लागला असून, सर्वाधिक 30.43 टक्के निकाल बीड जिल्ह्याचा लागला आहे. उर्वरित जिल्ह्यांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे- संभाजीनगर-30.08 टक्के, परभणी- 23.56 टक्के, जालना -26.61 टक्के आणि हिंगोली 28.86 टक्के.