नको बटर-पाव, आता फक्त हमीभाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोळा हा सण साजरा करताना तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील गोकुळ भोरकडे व समाधान भोरकडे या शेतकऱयाने आपल्या बैलांवर अनोखे संदेश रेखाटून बैलांना सजवले. त्यात ‘कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना मदत करा…’, ‘नको बटर-पाव, आता फक्त हमीभाव…,’ ‘मका पिकावर अळी, शेतकरी पडले बळी…,’ ‘मोदी है तो 370 मुमकीन है…’ असे विविध संदेश बैलांवर रेखाटून पोळा सणानिमित्त बैलांना सजवून त्याद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला तर सुहासिनींनी बैलजोडीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला.