LIVE : 370 बद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा; राहुल गांधी, पवारांना शहांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापूरमध्ये झाला. याच निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूरमध्ये दाखल झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी खासदार धनंजय महाडीक, आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.

‘मेगाभरती’तून उदयनराजे भोसले गायब का? वाचा सविस्तर…

धनंजय महाडिकांनी सांगितले राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेशाचे कारण, वाचा सविस्तर…

अमित शहा यांच्या भाषणातील मुद्दे –

  • भारतमातेच्या सुरक्षेबाबत मतभेद का? शहांचा 370 विरोध करणाऱ्यांना सवाल
  • देशहितासमोर अटलजींनी राजकारण मध्ये आणले नाही. अटलजींच्या या तत्वाचा राहुल गांधींना विसर – शहा
  • विरोधात असतानाही देशहित समोर ठेवून भाजपने साथ दिली  – शहा
  • 15 वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं? शहांचा सवाल
  • यशवंतदादांनंतर कार्यकाळ पूर्ण करणारे फडणवीस दुसरे मुख्यमंत्री – शहा
  • फडणवीस सरकारवर रुपयाच्या घोटाळ्याचाही आरोप नाही – शहा
  • तुमच्या आशार्वादामुळे मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान – शहा
  • 15 वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार भ्रष्ट होते – शहा

  • भाजपचा 5 वर्षाचा कार्यकाळ सुवर्ण अक्षरात कोरला जाईल – शहा
  • मोदी-फडणवीस जोडीने महाराष्ट्र समृद्ध केला – शहा
  • 370 हटवून मोदींनी अखंडतेचा संदेश दिला – शहा
  • छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, डॉ. आंबेडकर, शाहू महाराजांना प्रमाण करून शहांनी केली भाषणाला सुरुवात

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे – 

  • मुख्यमंत्र्यांनी शहांचा उल्लेख ‘सरदार’ असा केला
  • आमच्या यात्रेचे दैवत महाराष्ट्राची जनता – मुख्यमंत्री
  • गुंतवणूक, उद्योग, रोजगारात महाराष्ट्र नंबर वन! मुख्यमंत्र्यांचा दावा
  • कोकणातील पाणी मराठवाड्यात नेणार – मुख्यमंत्री
  • बारामतीत ईव्हीएम चांगलं, मग सोलापुरात वाईट कसं? विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा सवाल
  • विरोधकांच्या पहिलवानांना भाजपने चारीमुंड्या चित केले – मुख्यमंत्री