नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस, शेतकरीराजा सुखावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरसह संपूर्ण विदर्भात मंगळवारी मुसळधार पाऊस आला. या पावसाने एकीकडे शेतकरी सुखावला तर सामान्य माणसाचे मात्र हाल झाले. आणखी दोन दिवस विदर्भात प्रादेशिक हवामान केंद्राने दमदार इशारा दिला आहे. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण चार वर्षात प्रथमच भरले.

पूर्व विदर्भात गेल्या दोन दविसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील तीन तालुक्यात अतविृष्टी झाली असून सर्वाधिक 95.40 मिलीमीटर इतका पाऊस मोरगाव अर्जुनी तालुक्यात झाला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या लहान नाल्यावरून पाणी वाहत आहे.

सडक अर्जुनी तालुक्यातील बोथली ते म्हसवानी दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला आहे. म्हसवाणी या गावातील कार्तीक सोमेश्वर गौतम (18) हा युवक नाल्यात आंघोळीकरिता गेला असता वाहून गेला. मंगळवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

गोंदिया ते कोहमारा रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. मात्र पाणी हळूहळू ओसरत असल्यामुळे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अतविृष्टीमुळे गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठे इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या चार वर्षात प्रथमच या धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाल्यामुळे धरणातून 3.00 सीएम पाणी वाहत आहे.