
बीड जिल्ह्याच्या बालाघाट डोंगरपट्ट्यात असलेला कपिलधार धबधबा यंदा ओसंडून वाहण्यासाठी तब्बल तीन महिन्याची प्रतीक्षा करावी लागली. या आठवड्यातील रिमझिम पावसामुळे कोरडा पडलेला कपिलधार धबधबा काल पासून वाहू लागला आहे,.कपिलधार पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येथे येत असतात
बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध मांजरसुभा च्या बाजूला धुळे – संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गापासून 13 कि. मी अंतरावर बालाघटच्या डोंगररांगा कपिलधार हे तीर्थक्षेत्र आहे. 500 वर्षांपूर्वी कपिल मुनींनी या ठिकाणी अनुष्ठान केले होते या ठिकाणी त्यांची समाधी आहे. शेजारीच महादेवाचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे तर बाजूलाच काळ्या पाषाणावरून ओसंडून वाहणारा कपिलधार आहे.
दोन धारेतून हे पाणी दीडशे फूट उंचीवरून खाली कोसळत असते. कोसळणाऱ्या पाण्यामुळे खाली मोठे खळे तयार झाले आहे, जून महिन्यात दोन चार मोठे पाऊस झाले की कपिलधार चा धबधबा ओसंडून वाहत असतो. धबधब्याखाली पाण्याचा आनंद घेण्यासाठी बीड जिल्ह्यासह राज्यभरातून पर्यटक कपिलधार कडे येत असतात. यंदा दुष्काळामुळे नदी, नाले, तलाव कोरडे पडले होते. त्यात पावसाने दडी मारल्यामूळे कपिलधार कोरडा होता. मात्र या आठवड्यात सुरू असलेल्या रिमझिम आणी मुर पावसामुळे कपिलधार पुन्हा एकदा जिवंत झाला.


























































